शिवसेना एक प्रखर हिंदुत्ववादी पक्ष अशी या पक्षाची ओळख काय ते नाव काय तो दरारा पण आता कुठं गेलं ते नाव,दरारा ती ओळख काहीच नाही राहील एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं पण हे सगळं का घडलं याला जबाबदार कोण?
बाळासाहेब ठाकरेंच्या कडवट हिंदुत्ववादी विचारावर मराठी माणसाच्या समर्थनार्थ मराठी माणसाच्या,हिंदूंच्या हक्कासाठी स्थापन झालेला पक्ष शिवसेना .
शिवसेना म्हणजे शिवाजी महाराजांची सेना शिवरायांच्या विचारधारेशी स्वामिनिष्ठ असलेली सेना
१९ जून १९६६ रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना झाली एका बाळ ठाकरे नावाच्या वाघाने हिंदुत्वाची डरकाळी फोडून स्थापन केलेलं हे शिवसेना नावाचं वादळ आपल्या खांद्यावर भगवी पताका घेऊन मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ आपल्या पक्षबांधणी साठी कावर बावर होऊन दिवस रात्र महाराष्ट्राच्या माथ्यावर घोंगावू लागल संघर्षाच्या या काळात अनेक लोक बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेरित होउन संघटनेला जोडले जात होते पक्ष बांधणी साठी पक्ष बळकटीसाठी संघटना शहरापासून खेड्यांपर्यंत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा विडा उचलून दिवसरात्र रक्ताच पाणी करून धडपडत होते आत्ताच्या काळात कोणत्या पक्षाच्या ,नेत्याच्या प्रचाराला सभेला गेलं तरी तिथं जायच्या गाडी खर्चापासून ते माघारी येई पर्यंत जेवनापासून सर्व गोष्टींची सोय असते पण याच्या परस्पर विरोधी स्व खर्चाने पक्षाच्या बांधणीसाठी प्रचारासाठी बाळासाहेबांचा एक एक शब्द ऐकण्यासाठी दिवसरात्र पळणारा वेळ प्रसंगी रस्त्याच्या कडेला बसून घरची बांधून आणलेली हक्काची शिदोरी खाऊन दिवस काढणारा एक सच्चा स्वामिनिष्ठ कार्यकर्ता ही फक्त याच पक्षाने पाहिला
या स्वामिनिष्ठ कार्यकर्त्याच्या मेहनतीचं फळ की काय म्हणून १९९९ साली मनोहर जोशींच्या रूपाने शिवसेनेचा पाहिला मुख्यमंत्री झाला सच्चा स्वामिनिष्ठ शिवसैनिकांच्या कष्टाचं चीज झालं पक्ष संघटना मजबूत होऊ लागली शहरापासून खेड्यांपर्यंत सरपंचापासून ते खासदारापर्यंत सगळीकडे शिवसेनेचा दबदबा पहायला मिळाला ग्रामपंचायतीपासून अगदी मंत्रालयापर्यंत सर्वत्र भगव वादळ येऊ लागलं यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं कधीही माघारी वळून पाहिलं नाही २०१९ ला शिवसैनिकांच्या हक्काचा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला सर्वांनी आनंद साजरा केला पण हे सर्व क्षणिक होत २०२२ पक्षासाठी संघर्षाचा काळ ठरला पक्षात कधीही भरून न निघणारी फूट पडली हे सर्व या महाराष्ट्रान अनुभवलं पक्षातीलच एका उच्च पदस्थ व्यक्तीच्या नेतृत्वाखाली ५६ पैकी ४० आमदारांचा गट पक्षाशी बंड वेगळा होऊन रातोरात फरार झाला
शिवसेनेला हे बंड काही नव नव्हतं आज पर्यंत या पक्षाने अनेक चढ उतार पाहिले होते पण हे बंड या सगळ्याच्या तुलनेत खूप मोठ होत पक्षाला खिंडार पडलं होत आमदारांमागे खासदार पदाधिकारी कार्यकर्ते सर्व हवशे गवशे नवशे पक्ष सोडून जात होते पण एखाद्या पक्षात जेव्हा एवढं मोठं बंड होत तेव्हा ते पूर्वनियोजन करून केलं असणार हे निश्चित मग आपल्या पक्षातील अंतर्गत वाढती धुसफूस,कलह,नाराजी ही प्रस्थापितांच्या लक्षात कशी येत नाही हे मात्र नवलच. यात चूक कोणाची बंड केलेल्या ४० लोकांची का उरलेल्या तत्कालीन प्रस्थापितांची यावरती आपण भाष्य नाही केलं तरच ठीक राहील कारण दोन्ही गटांकडून दररोज एकमेकावर टीका, टिपणी केली जात आहे चिखलफेक केली जात आहे शब्दांची धार असलेले जहरी बाण सोडले जात आहे पण हे सगळं निरार्थकच वाटत नाही का ?
या विद्रोही राजकारणात बाळासाहेबांचा सर्वसामान्य सच्चा शिवसैनिक मात्र भरडला गेला ज्या पक्षाच नाव,चिन्ह,प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्यानं एवढी धडपड केली त्या नावासाठी आणि चिन्हासाठी एकाच आईची दोन लेकर भांडली कोणत्या का होईना एका गटाकडे शिवसेना नाव राहिलं चिन्ह पण राहिलं पण बाळासाहेबांच्या शिवसेनेचा धाक,दरारा,प्रतिष्ठा,स्वाभिमान सर्व काही धुळीस मिळालं असं म्हणलं तरी काय वावग ठरणार नाही स्वाभिमानी धनुष्यामधून अभिमानाने सुटणारा कल्याणकारी बाण पूर्ण बोथट झाला हेच खरे मध्यंतरी एका पक्षाचं प्रचारगीत ऐकलं त्यात एक कडव होत
वाघ गेला सोडून आता जंगलाला नाही वाली
गब्बर की धाड अन् त्याच घर खाली
धनुष्याला बाण नाही बाणाला धार नाही
कडवा विचार नाही त्याचं काही खर नाही
हे शब्द आज सत्यात उतरताना दिसत आहेत याच वाईट आज प्रत्येक शिवसैनिकाला वाटत असेल ही मात्र खंतच.
या सर्वात तुमच्या आमच्या सामान्य नागरिकाला पडलेला प्रश्न एकच बाळासाहेबांना अभिप्रित शिवसेना हीच का......?


0 Comments
ब्लॉग मध्ये व्यक्त केलेले विचार हे माझे स्वतःचे वैयक्तिक विचार असून त्यात कोणत्याही धर्माचा, जातीचा,संप्रदायाचा किंवा प्रदेशाचा तसेच अन्य कोणत्याही गोष्टीचा अपमान होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली आहे आणि यातून मी समाजातील वास्तव स्थिती माझ्या नजरेतून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे