सह्याद्रीच्या शिखरावर तुमच्या शौर्याचा झळकत राहील कळस
तुम्हीच आमचे विठ्ठल शोभे परी अंगणातली पवित्र तुळस
महादेवाच्या राऊळात ही राजन तुमचे अस्तित्व भासत राहे
देवाहूनयी मोठा मजला माझा शिवबा राजा आहे
घडवली ज्याने सृष्टी मागणं एकच करतो त्या विधात्याला
दृष्टांचा संहार करणाऱ्या पुन्हा जन्म दे माझ्या शिवबाला
सह्याद्रीचा कणकणही त्याच्याच या शिवरुद्राचा तांडव पाहे
रायगडाच्या माथ्यावरती माझा देव विसावला आहे
माझा शिवबातुमच्यामुळेच घेतो श्वास तुमच्यापुढे झुकवतो माझा माथा
अद्भुत राजन तुम्ही अन् अद्भुत हिंदवी स्वराज्य गाथा
तुमच्या पराक्रमाचे वारे राजन माझ्या नसानसातून वाहे
स्वराज्याचा नरसिंह आजही माझ्या हृदयात जागा आहे



1 Comments
जय शिवराय 🚩
ReplyDeleteब्लॉग मध्ये व्यक्त केलेले विचार हे माझे स्वतःचे वैयक्तिक विचार असून त्यात कोणत्याही धर्माचा, जातीचा,संप्रदायाचा किंवा प्रदेशाचा तसेच अन्य कोणत्याही गोष्टीचा अपमान होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली आहे आणि यातून मी समाजातील वास्तव स्थिती माझ्या नजरेतून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे